सिल्लोड, (प्रतिनिधी) : माणिकनगर ता. सिल्लोड येथील सिद्धेश्वर हायस्कुलमध्ये आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील विद्यार्थी शाळेत शिक्षणासाठी पायी ये-जा करीत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून वसतिगृहाची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील माणिकनगर (भवन) ता. सिल्लोड येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील शेतमजूर मागासवर्गीय गरीब व शेतकऱ्याच्या मुला-मुलींसाठी मोफत शिक्षणासाठी माजी मंत्री स्व. माणिकराव पालोदकर यांनी इयत्ता ५ वी ते १० वी वर्गात शिक्षण घेण्यासाठी सिद्धेश्वर हायस्कुलचे सन १९८० मध्ये स्थापना केली असून या शाळेत आजूबाजूच्या जवळपास ३० ते
४० किमी अंतरावरील उदा. सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग, अंधारी, पळशी लोणवाडी, गव्हाली, वरुड पिंपरी, तर भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा, आव्हाना, खंडाळा, तांदुळवाडी, गोशेगाव आदी खेड्यापाड्यातील हायस्कुलमध्ये आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील विद्यार्थी शाळेत शिक्षणासाठी पायी ये-जा करीत होते.
या शाळेतील माजी विद्यार्थी आजही मोठं मोठ्या पदावर विराजमान आहेत. या शाळेने आजही गुणवंत्तेत चांगला दर्जा टिकवलेला असून कालांतराने या आजूबाजूच्या काही खेड्यात या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे विद्यार्थ्यांसाठी शाळेची सोय झाली. मात्र आजही या सिद्धेश्वर हायस्कुलच्या आजूबाजूच्या वरुड पिंपरी, पिंपळगाव पेठ बोरगाव कासारी, गणेशवाडी, केन्हाळा फाटा, केन्हाळा वस्ती, निल्लोड फाटा, गजानननगर, तांडाबाजार, चिंचखेडा चिंचखेडा वस्ती, भीमनगर, कळम वस्ती, कांबळे वाडी, माळवाडी, उंबरे वस्ती आदी ठिकाणाहून भूमिहीन शेतमजूर, होतकरू मागासवर्गीय व गरीब शेतकरी कुटुंबातील (मुले-मुली) विद्यार्थी या सिद्धेश्वर हायस्कुलमध्ये स्थानिक आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील व आदी बाहेर गावचे मिळून जवळपास ११५० विद्यार्थी निवासी वसतिगृहाची मागणी या शाळेच्या आजूबाजूच्या खेड्यापड्यातील, तांडा, वस्त्यावरील शेतमजूर भूमिहीन, मागासवर्गीय, गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी (मुला मुलींसाठी) माणिकनगर (भवन) विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृहाची अंत्यत आवशकता आहेत.
तरी महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष देऊन माणिकनगर (भवन) विद्याथ्यर्थ्यांसाठी निवासी वसतिगृहास मान्यता द्यावी अशी मागणी ग्रामस्थानी केली आहेत. वस्त्यावरून येणारे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सिद्धेश्वर पायी पायपीट करतात किंवा हायस्कुलमध्ये शिक्षण घेण्यासाठी महामार्गावरून वाहनांना हात बाहेर गावाहून वाड्या देऊन जीवाची पराकष्ठा करीत शाळेत येऊन शिक्षण घेतात.
सिद्धेश्वर हायस्कुलमध्ये स्थानिक व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील आदी बाहेर गावचे मिळून जवळपास ११५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बाहेर गावाचे विद्यार्थी पायी ये-जा करून शाळेत शिक्षण घेत आहेत. तसेच या शाळेतील खेड्यापड्यातून व बाहेरगावाहून शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी (विद्यार्थ्यांसाठी) मागासवर्गीय वसतिगृहाचीं अंत्यत आवशकता आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
मुख्याध्यापक, सिद्धेश्वर हायस्कुल माणिकनगर
- विष्णू फरकाडे















